विजयी फटका मारत रहाणेनं केली राहुल द्रविडची बरोबरी
क्रीडा

विजयी फटका मारत रहाणेनं केली राहुल द्रविडची बरोबरी

मेलबर्न : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर आणि भेदक गोलंदाजीच्या जिवावर भारतीय संघानं बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ गड्यांनी पराभव केला. या सामन्यात अंजिक्य रहाणेनं अनेक विक्रम मोडले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या एका खास विक्रमाची बरोबरी करण्याचा सुवर्णयोगही रहाणेनं साधला आहे. पहिल्या डावात १३१ धावांनी पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात २०० धावांपर्यंत मजल मारु शकला. ऑस्ट्रेलियानं दिलेलं ७० धावाचं लक्ष भारतानं दोन गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

दुसऱ्या डावात लागोपाठ दोन विकेट पडल्यानंतर गिल आणि रहाणे यांनी भारतीय संघाला विजय मिळवून दिला. विजयासाठी एक धाव कमी असताना रहाणे शानदार फटका मारत भारताला विजय मिळून दिला. भारतीय संघासाठी विजयी फटका मारण्याची रहाणेची ही पहिलीच वेळ होती. राहुल द्रविडनंतर ऑस्ट्रेलियात विजयी फटका मारणारा रहाणे दुसराच खेळाडू ठरला आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात विजय मिळवत भारतीय संघानं बॉर्डर गावसकर मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.