अर्जुन तेंडुलकरचा धमाका; एका षटकात लगावले ५ षटकार
क्रीडा

अर्जुन तेंडुलकरचा धमाका; एका षटकात लगावले ५ षटकार

मुंबई : आयपीएलच्या २०२१च्या हंगामाची तयारी सुरु झाली असून अर्जुन तेंडुलकरने आपली नोंदणी केली आहे. १८ फेब्रुवारीला आयपीएलचा लिलाव आहे. पण या लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकर यानं अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रविवारी (१४ फेब्रुवारी) पोलिस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील गट अ च्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात अर्जुन तेंडूलकर यानं आपल्यातील अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली. अर्जुन तेंडूलकर यानं या सामन्यात ३१ चेंडूत विस्फोटक फलंदाजी करत ७७ धावांचा पाऊस पाडला. यासोबतच गोलंदाजी करताना तीन महत्वाचे बळीही मिळवले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२१वर्षीय अर्जुन तेंडुलकर यानं ३१ चेंडूचा सामना करताना पाच चौकार आणि आठ षटकारांचा पाऊस पडला. अर्जुन तेंडुलकर यानं फिरकीपटू हाशिर दाफेदार याच्या एका षटकात पाच षटकार लगावत विस्फोटक फलंदाजी केली. अर्जुन तेंडूलकरच्या या अष्टपैलू खेळीच्या बळावर एमआयजी क्रिकेट क्लबने पोलीस शील्ड क्रिकेट स्पर्धेत इस्लाम जिमखान्याचा १९४ धावांनी पराभव केला. एमआयजीनं ४५ षटकांत ७ बाद ३८७ धावां केल्या. मात्र, मिहिर अगरवालच्या ७७ धावानंतरही त्यांचा डाव १९१ धावांवर आटोपला.

दरम्यान, आयपीएल लिलावासाठी अर्जुन सचिन तेंडुलकरची मूळ किंमत २० लाख रुपये आहे. अर्जुन तेंडुलकरला कोणता संघ विकत घेणार याबाबतच्या चर्चेला उधाण आलं आहे.