फुटबॉल विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये होणार मोठे बदल, फिफाने मैदानांतील रेफरींना दिल्या सूचना…
क्रीडा

फुटबॉल विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये होणार मोठे बदल, फिफाने मैदानांतील रेफरींना दिल्या सूचना…

दोहा : फुटबॉल विश्वचषकाला दमदार सुरुवात झाली आहे. पण हा विश्वचषक सुरु असतानाच त्यामध्ये आता मोठे बदल केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण फिफाने आता फुटबॉलच्या रेफरींना खास सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता फुटबॉलच्या विश्वचषकातील सामने अजून फास्ट होणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फुटबॉल हा ९० मिनिटांचा खेळ आहे. पण या विश्वचषकातील काही सामने १०० मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालले आणि हीच गोष्ट आता फिफाने हेरली आहे. जर खेळाची मिनिटे वाढली तर त्यामधील रंगत कमी होऊ शकते, असे फिफाला वाटत असावे. त्यामुळेच त्यांनी आता हा खेळ अधिक फास्ट कसा करता येईल, यासाठी खास सूचना केल्या आहेत. वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील सामने लांबत आहेत. सामने जास्त लांबणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना फिफाने रेफरींना केली आहे. वेळ दवडणे आणि उशिर याकडे कसोशीने लक्ष द्या अशी सूचना फिफाने केली आहे.

फिफा १९६६ च्या स्पर्धेपासून भरपाई वेळेची नोंद करीत आहे. त्यातील सर्वाधिक चारची नोंद स्पर्धेतील पहिल्या चार सामन्यात झाली. इंग्लंड – इराण सामन्यातील उत्तरार्धाची वेळ १३ मिनिटे आठ सेकंदांनी वाढवण्यात आली. याच सामन्यातील पूर्वार्ध १४ मिनिटे ८ सेकंदांनी वाढवण्यात आला होता. इराणचा गोलरक्षक अलीरेझा बेईरॅनँड याच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यावर मैदानात उपचार केल्याने हे लांबले.

अमेरिका-वेल्स आणि नेदरलँड्स-सेनेगल या दोन्ही लढतीत उत्तरार्धात दहा मिनिटांनी वाढवला गेला. एवढा भरपाई वेळ फुटबॉलमध्ये क्वचितच देण्यात येतो. यामुळे रेफरींना सामना थांबल्याच्यावेळेकडे नेमके लक्ष देण्यास सांगितले आहे. रशियातील वर्ल्ड कप स्पर्धेच्यावेळी प्रत्येक सामना सरासरी सात मिनिटे लांबत असे, याकडे अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे. त्याची तुलना जर आतापर्यंतच्या विश्वचषकातील सामन्यांशी केली तर हा फरक फार मोठा आहे. त्यामुळे आता या विश्वचषकात मैदानातील रेफरी या गोष्टी कशा हाताळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे आता या विश्वचषकातील सामने किती वेळेत संपतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.