रोहित शर्माने दिला मोठा धक्का; सामनावीर ठरलेला हार्दिक पंड्या संघाबाहेर, पाहा कोणाला दिली संधी
क्रीडा

रोहित शर्माने दिला मोठा धक्का; सामनावीर ठरलेला हार्दिक पंड्या संघाबाहेर, पाहा कोणाला दिली संधी

दुबई : हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने जोरदार धक्का दिला आहे. कारण या सामन्यासाठी रोहितने गोल्या सामन्यात सामनावीर हार्दिक पंड्याला संघाबाहेर केले आहे. हार्दिकला संघाबाहेर करत रोहितने कोणाला संघात स्थान दिले आहे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टॉस झाल्यावर रोहितने ही गोष्ट सांगितली. हार्दिकला संघाबाहेर करताना रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे. रोहितने या सामन्यासाठी संघात एकमेव बदल करण्यात आला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघात तीन मोठे बदल होऊ शकतात, असे म्हटले जात होते. भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. पण त्यामध्ये अवेश खान हा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. अवेशने २ षटकांत १९ धावा दिल्या आणि त्यामुळेच त्यानंतर त्याला गोलंदाजी दिली नाही. त्यामुळे या सामन्यासाठी अवेश खानला संघाबाहेर केले जाऊ शकते. अवेशच्या जागी यावेळी भारतीय संघात दीपक चहरला संधी मिळू शकते. कारण चहर हा वेगवान गोलंदाजी तर करतोच, पण त्याचबरोबर तो उपयुक्त फलंदाजीही करू शकतो, असे म्हटले जात होते.

भारतीय संघात दुसरा बदल हादेखील गोलंदाजीत होऊ शकतो, असे म्हटले जात होते. भारतीय संघात यावेळी दुसरा बदल हा फिरकी गोलंदाजीमध्ये होऊ शकतो. कारण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला चांगली गोलंदाजी करता आली नव्हती. चहलला यावेळी चार षटके टाकण्यासाठी दिली होती, पण या चार षटकांमध्ये त्याेन ३२ धावा दिल्या आणि एकही विकेट त्याला मिळवता आली नाही. त्यामुळे या सामन्यासाठी त्याला संघाबाहेर केले जाऊ शकते. चहलच्या जागी संघात स्थान देण्यासाठी दोन पर्याय भारतीय संघापुढे आहेत. भारतीय संघ यावेळी अनुभवाच्या जोरावर आर. अश्विनला संघात स्थान देऊ शकते. कारण त्याच्याकडे चांगला अनुभव आहे आणि तो उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. भारताकडे दुसरा पर्याय हा दीपक हुडाचा असेल. दीपकने आतापर्यंत प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे आणि तो भारतासाठी लकी मॅचविनरही ठरला आहे.

भारतीय संघातील हा तिसरा बदल होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रिषभ पंतला संधी न दिल्यामुळे काही जणांनी भारतीय संघावर टीका केली होती. पण दुसऱ्या सामन्यात आता त्याला संधी दिली जाऊ शकते. कारण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकला आपली छाप पाडता आली नव्हती. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यासाठी दिनेशच्या जागी पंतच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. पण फक्त एका सामन्याच्या आधारावर दिनेशला संघाबाहेर काढायचे का, हा विचार भारतीय संघाला यावेळी करावा लागेल. कारण दिनेशकडे चांगला अनुभव आहे आणि तो सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मातही आहे.