दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाकडूनही अंतिम ११ची निवड
क्रीडा

दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाकडूनही अंतिम ११ची निवड

मेलबर्न : दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघानेही आपल्या अंतिम ११ खेळाडूंचे नावे जाहीर केली आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. एमसीजीवर हा सामना होणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात कुणाला संधी मिळणार, काही बदल होणार का? अशी उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना होती. अशातच ऑस्ट्रेलियन संघाचे कोच जस्टीन लँगर यांनी यावर भाष्य करत दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असं सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने भारताला केवळ 36 धावांत गारद करुन 8 विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवला. इतका मोठा आणि शानदार विजय मिळवल्यानंतर टीममध्ये काही बदल करण्याची काही गरज आहे असं वाटतं नाही, असं जस्टीन लँगर म्हणाले. ऑस्ट्रेलियन संघ मालिका सुरु होण्यापूर्वीपासून फिटनेसशी झुंजतो आहे. आमच्या अनेक खेळाडूंना दुखापती होत आहेत. धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला दुखापतीच्या कारणास्वत बाहेर जावं लागलं आहे. वॉर्नरच्या जागी जो बर्न आणि मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात करताना दिसून येणार आहे. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज सीन ऐबॉट कोरोना प्रोटोकॉलमुळे दुसरी कसोटी खेळू शकणार नाही, असं लँगर म्हणाले.

असा असेल ऑस्ट्रेलियन संघ
टीम पेन (कर्णधार), मॅथ्यू वेड (विकेट कीपर), जो बर्न्स, मारनस लबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिंस, मिचेल स्टार्क, नॅथन लॉयन, जोश हेजलवुड