पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला आफ्रिकेच्या अमलाचा विक्रम
क्रीडा

पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला आफ्रिकेच्या अमलाचा विक्रम

नवी दिल्ली : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विश्वविक्रम केला आहे. या जागतिक विक्रमातून बाबर आझमने हाशिम अमलाचा विक्रम मोडत भारताचा कर्णधार विराट कोहलीसारख्या दिग्गजांना मागे सोडले आहे. एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विक्रम मोडणारे शतक ठोकले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आझमने १३९ चेंडूत १५८ धावा केल्या आणि अनेक जुने विक्रम मोडले. तसेच अनेक नवीन विक्रम देखील नोंदवले. या डावाच्या जोरावर बाबर आझमने चार मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या सामन्यात शतक पूर्ण करत बाबर आझमने वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या. पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्यात आणि कर्णधार म्हणून सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रमही त्याने केला. इंग्लंडविरुद्ध कोणत्याही सामन्यात कर्णधाराकडून इतक्या धावा केल्या नव्हत्या त्यामुळे हा विक्रमही त्याच्या नावावर झाला.

तसेच सर्वात कमी डावात १४ एकदिवसीय शतके पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम बाबर आझमच्या नावावर झाला आहे. बाबर आजमने ८१ सामन्यांमध्ये १४ एकदिवसीय शतके पूर्ण केली. वेगवान १४ एकदिवसीय शतकांच्या यादीत २६ वर्षीय हशिम अमला (८४ सामने), डेव्हिड वॉर्नर (९८ सामने), विराट कोहली (१०३ सामने) आणि क्विंटन डी कॉक (१०४ सामने) यांचा समावेश आहे.

आयसीसी वनडे क्रमवारीत बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात बाबर आझमने १३९ चेंडूत १५८ धावांची शानदार खेळी खेळली, ज्यात १४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. पाकिस्तानने इंग्लंडसमोर ३३२ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु त्यांना ३ गडी राखून पराभव पत्करावा लागला.