क्रीडा

ज्या वयात खेळाडू रिटायर होतात, त्या वयात भारताच्या पहिल्या कसोटी कर्णधाराने केली होती सुरुवात

भारतियांना क्रिकेटचे एक वेगळेच वेड आहे. भारतियांची क्रिकेटसाठी काहीही करायची तयारी असते. असंच वेड भारतीय खेळाडूंनाही सुरुवातीच्या काळात होते. भारतीय क्रिकेटमध्ये असाही एक खेळाडू होता, जो फिटनेसच्या बाबतीत आजही आदर्श मानला जातो. हे खेळाडू दुसरे कोणी नसून भारताचे पहिले कसोटी कर्णधार कर्नल कोट्टारी कनकैया तथा सी. के. नायडू हे आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१९८५ला जन्म
ज्या वयात आताचे खेळाडू निवृत्ती स्विकारतात त्या वयात, भारताच्या पहिल्या कसोटी कर्णधार सी के नायडू यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. 31 ऑक्टोबर 1895 ला महाराष्ट्रातील नागपुर शहरात सी. के. नायडू यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा हे वकील होते. त्यासोबतच अखिल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे ते सक्रिय नेते होते. सी. के. नायडू यांना मात्र स्टार क्रिकेटर बनायचे होते. याची पहिली पायरी म्हणून त्यांची हिसलोप कॉलेजिएट हाय क्रिकेट संघात त्यांची निवड झाली. तिथे त्यांनी चांगले प्रदर्शन केले. त्यानंतर १९१६मध्ये मुंबईत एक त्रिकोणी मालिका खेळण्याची संधी त्यांना मिळाली. तिथेही त्यांनी जोरदार फलंदाजी केली. त्यानंतर त्यांनी बराच काळ क्रिकेट खेळले नाही. परंतु १९२६ त्यांच्यासाठी नवी उमंग घेऊन येणारे वर्ष ठरले. ते वर्ष त्यांच्या आयुष्यातील गोल्डन वर्ष ठरले. हिंदू संघ आणि एम. सी. सी. या दोघांत झालेल्या सामन्यात त्यांनी १८७ चेंडूत १५३ धावा काढल्या. यामध्ये त्यांच्या ११ षटकारांचा आणि ११ चौकारांचा समावेश होता. त्यांच्या या खेळीसाठी त्यांना चांदीची बॅटही भेट म्हणून मिळाली होती.

1932 मध्ये भारतीय टेस्ट क्रिकेट संघाचे कर्णधार
1932 मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. इंग्लंडविरुद्ध खेळला जाणारा हा भारताचा पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता आणि त्याचे कर्णधार हे सी के नायडू होते. इंग्लंडसाठी हा खेळ जुना होता. पण, भारतीयांसाठी हे सर्वकाही नवीन होतं. त्यातही सी के नायडू यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंड संघाला जोरदार टक्कर दिली. या सामन्यात सी. के. नायडू यांना फिल्डिंग करत असताना हाताला जोराची जखम झाली होती. ते खेळण्याच्या परिस्थितीतही नव्हते. तरीही त्यांनी फलंदाजी केली आणि ४० धावा पटकावल्या.

सी के नायडू इंग्लंड दौऱ्यात एकूण २६ प्रथमश्रेणी सामने खेळले त्यामध्ये त्यांनी ४०.४५ च्या सरासरीने १६१८ धावा काढल्या आणि ६५ बळी घेतले. या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ३२ षटकार खेचले होते. त्यांचा एक षटकार तर एवढा दूर होता की, त्या षटकारांमुळे त्यांना 1933 मध्ये विज़डनद्वारे क्रिकेटर ऑफ़ द ईयरचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर ६८व्या वर्षापर्यंत ते भारतीय संघासाठी क्रिकेट खेळत होते. नायडू यांनी एकूण ०७ कसोटी सामने खेळले. ७ सामन्यांच्या १४ डावात त्यांनी दोन अर्धशतकांच्या मदतीने एकूण ३५० धावा काढल्या. यातच त्यांनी गोलंदाजी करताना ७ सामन्यांच्या १० डावात २.७च्या सरासरीने एकूण ९ बळी घेतले होते.

नायडू एकूण २०७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 35.94 च्या सरासरीने एकूण 11,825 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये त्यांच्या 26 शतकांच आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच त्यांनी गोलंदाजी करताना ४११ बळी घेतले आहेत. १५ ऑगस्ट १९३६ला त्यांनी इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. अशाप्रकारे आकड्यांच्या बाबती बोलायचे झाल्यास त्यांनी खूप कमी क्रिकेट खेळले असले तरी त्यांच्या नावावर असलेल्या काही नोंदी या कायम राहतील.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर १९४१मध्ये ते बाथगेट लिवर टोनिकचे ब्रँड अँबेसिडरच्या रुपात दिसले. ते पहिले असे खेळाडूही आहेत ज्यांना भारत सरकारने 1956 मध्ये पहिला पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला, पद्मभूषण पुरस्कार हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

१४ नोव्हेंबर १९६७ला क्रिकेटमधून निवृत्ती
पहिल्या भारतीय कसोटी संघाच्या कर्णधाराने १४ नोव्हेंबर १९६७ला क्रिकेटमधून वयाच्या ६७व्या वर्षी निवृत्ती घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत