म्हणून मोईन अलीने आयपीएलमध्ये खेळण्यास दिला होता नकार; अखेर ती मागणी मान्य?
क्रीडा

म्हणून मोईन अलीने आयपीएलमध्ये खेळण्यास दिला होता नकार; अखेर ती मागणी मान्य?

चेन्नई : आयपीएलच्या १४व्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. यावर्षी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्सचा संघ नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. वर्ष २००८ मध्ये आयपीएलला सुरूवात झाल्यापासून चेन्नईच्या संघाने पहिल्यांदाच आपल्या जर्सीत बदल केला आहे. पण, या जर्सीमधील एका लोगोवर चेन्नईकडून खेळणारा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने आक्षेप घेतल्याचं वृत्त रविवारी माध्यमांमध्ये आलं होतं त्यानं थेट खेळण्यासच नकार दिल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यावर आता चेन्नई सुपर किंग्सकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सीएसकेच्या नवीन जर्सीत एसएनजी १०००० या मद्य उत्पादन कंपनीचाही लोगो आहे. मोईन अली हा इस्लाम धर्माचे पालन करतो, त्यामुळे तो अजिबात मद्यपान करत नाही किंवा प्रचारही करत नाही. त्यामुळे त्याने ही जर्सी परिधान करण्यास नकार दिला आणि लोगो हटवण्याची मागणी केली. त्याची मागणी चेन्नईच्या व्यवस्थापनाने मान्य केली व अखेर लोगो हटवण्यात आला आहे.

दरम्यान, सीएसकेकडून अशाप्रकारची कोणतीही मागणी मोईन अलीकडून करण्यात आली नव्हती, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. रविवारी वृत्तसंस्था आयएएनएसशी बोलताना चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एस. विश्वनाथन यांनी, मोईनने सीएसकेकडे कोणताही लोगो काढण्याची विनंती केलेली नाही असं स्पष्ट केलं आहे.