रविंद्र जडेजाची कामगिरी दमदार; एकहाती फिरवला सामना
क्रीडा

रविंद्र जडेजाची कामगिरी दमदार; एकहाती फिरवला सामना

दुबई : सर रविंद्र जडेजाने दमदार कामगिरी करत चेन्नईला विजय मिळवून दिला आहे. अटीतटीच्या सामन्यात चेन्नईने कोलकात्यावर २ गडी राखून मात केली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात खऱ्या रवींद्र जडेजा बाजीगर ठरला. संघातील खेळाडू झटपट बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाने १९ व्या षटकात आक्रमक खेळी करत विजय जवळ खेचून आणला. रविंद्र जडेजाने ८ चेंडूत २२ धावा केल्या. यात २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. मात्र विजयी फटका मारण्याच्या नादात शेवटच्या षटकात सुनील नरेनच्या चेंडूवर पायचीत झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोलकात्यानं दिलेलं १७२ धावांचंआव्हान पूर्ण करण्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिस जोडी मैदानात उतरली. या जोडीनं संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. संघाची धावसंख्या ७४ असताना चेन्नईला ऋतुराज गायकवाडच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर फाफला मोइन अलीची साथ मिळाली. संघाची धावसंख्या १०२ असताना डुप्लेसिस बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेला अंबाती रायडू खेळपट्टीवर जास्त वेळ तग धरू शकला नाही. मोइन अली बाद झाल्याने चेन्नईला चौथा धक्का बसला.

मोइन अलीनंतर लगेचच सुरेश रैना २ धावा घेण्याच्या नादात धावबाद झाला. सुरेश रैनाच्या मागोमाग धोनीही त्रिफळाचीत झाला. त्यानंतर रवींद्र जडेजाच्या आक्रमक खेळीने चेन्नईला विजयापर्यंत आणलं. मात्र, सॅम करन बाद झाल्याने संघावरील दडपण वाढलं. त्यानंतर शार्दुल ठाकुर तीन धावा करत जडेजाला स्ट्राईक दिली. ३ चेंडूत १ धावा हवी असताना पहिला चेंडू हुकला. त्यानंतरच्या चेंडूवर जडेजा बाद झाला. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आली. मात्र शेवटच्या चेंडूवर दीपक चहरने फटका मारत संघाला विजय मिळवून दिला.