वाढदिवसादिवशी बीसीसीआयकडून पुजाराचा सन्मान; बहाल केली मानाची पदवी
क्रीडा

वाढदिवसादिवशी बीसीसीआयकडून पुजाराचा सन्मान; बहाल केली मानाची पदवी

नवी दिल्ली : चेतेश्वर पुजाराचा आज वाढदिवस. आज पुजाराने ३४व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त बीसीसीआयने पुजाराला एक पदवी बहाल करत त्याचा सन्मान केला आहे. हा खेळाडू शरीरावर वेगवान चेंडूंचा मारा सहन करतो, तरीदेखील खेळपट्टीवर खंबीरपणे तळ ठोकून उभा राहतो. हा खरा धाडसी खेळाडू आहे. ८१ कसोटी सामने, ६ हजार १११ धावा, १३ हजार ५७२ चेंडू आणि १८ शतकं ठोकणाऱ्या भारतीय संघाचा आधारस्तंभ (Mr. Dependable) चेतेश्वर पुजारा याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!, असं ट्विट बीसीसीआयने केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चौथ्या कसोटीच्या चौथ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चेतेश्वर पुजारावर अनेक प्रहार करण्याचे प्रयत्न केले. पण कांगारुंच्या शरीरभेदी माऱ्याला पुजारा पुरून उरला. मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, पॅट कमिन्स आणि कॅमरॉन ग्रीन या ऑस्ट्रेलियाच्या चार वेगवान गोलंदाजांनी सातत्याने पुजाराच्या शरीराच्या जवळपास मारा केला. चेंडूला मिळणारी उसळी पाहता अनेक चेंडू पुजाराने अंगावर खाल्ले. स्वत:ची विकेट वाचवताना कधी खांद्याजवळ, कधी हाताच्या बोटावर तर कधी हेल्मेटवर चेंडू आदळला. पण एखाद्या भिंतीप्रमाणे अभेद्य असा तो यजमान संघापुढे उभा राहिला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीत चौथ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा मारा शरीरावर झेलत २००हून अधिक चेंडू खेळले. त्याच्या चिवट खेळीपुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा माराही फिका पडला. शरीराच्या विविध अवयवांवर चेंडूचा मारा सहन करत त्याने धडाकेबाज खेळी केली. त्याचं हे रूप पाहून बीसीसीआयने त्याला ही खास पदवी बहाल केली.