भारतीय संघाचा ‘हा’ खेळाडू ममतांच्या मंत्रीमंडळात झाला क्रीडामंत्री
क्रीडा

भारतीय संघाचा ‘हा’ खेळाडू ममतांच्या मंत्रीमंडळात झाला क्रीडामंत्री

कोलकाता : दिल्लीचा खासदार गौतम गंभीरप्रमाणे क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या खेळपट्टीवर प्रवेश केलेला भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीला पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या क्रीडामंत्री होण्याचा बहुमान मिळाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांनी सोमवारी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला. यात तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) ४३ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीचेही नाव आहे.

ममता बॅनर्जी सरकारमध्ये मनोज तिवारीला क्रीडा व युवक राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी क्रिकेटपटू मनोज तिवारी आपल्या पत्नीसमवेत टीएमसीमध्ये दाखल झाला. लोकांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण भाजप करीत असल्याचा आरोप त्याने केला होता. टीएमसीने त्यांना हावडाच्या शिबपूर विधानसभा मतदार संघातून तिकीट दिले. जिथे त्याने विजय मिळविला.

मनोज तिवारीची क्रिकेट कारकिर्द
मनोज तिवारीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त काळ राहिली नाही. पण त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली. सामन्याआधी तो दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर त्याला २००८मध्ये भारतीय संघात संधी मिळाली होती.