दिल्लीच्या क्रिकेटपटूची जोरदार कामगिरी; ठोकले टी-२०मध्ये द्विशतक !
क्रीडा

दिल्लीच्या क्रिकेटपटूची जोरदार कामगिरी; ठोकले टी-२०मध्ये द्विशतक !

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. असाच काहीसा पराक्रम दिल्लीचा क्रिकेटपटू सुबोध भाटीने केला आहे. सुबोधने टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकत सर्वांचा लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. सुबोधने २०५ धावांची नाबाद खेळी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एका क्लब टी-२० सामन्यात खेळत सुबोधने द्विशतक ठोकले. त्याच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने १०२ धावा १७ चेंडूत केल्या. म्हणजे त्याने १७ षटकार ठोकले. याशिवाय त्याने आपल्या खेळीत १७ चौकार लगावले. सुबोध सलामीला गेला आणि ७९ चेंडू खेळून नाबाद परतला. रणजी क्रिकेटर सुबोधच्या संघाने एकूण २५६ धावा केल्या. त्याने २५०च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. सुबोधच्या संघाने २० षटकांत एक गडी गमावत २५६ धावा केल्या.

आयपीएलमध्ये ख्रिस गेल, आंद्रे रसेल, विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स हे स्टार क्रिकेटपटू गोलंदाजांवर बरसतात. गेलच्या नावावर आयपीएलमध्ये ६ शतके आहेत, तर विराट कोहलीने लीगमध्ये ५ शतके ठोकली आहेत. हिटमॅन रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये २६४ धावा ठोकत सर्वांना स्तब्ध केले होते. असाच काहीसा हा विक्रम सुबोधने केला असून याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. यापूर्वीही सुबोधने दिल्ली संघासाठी देशांतर्गत स्पर्धेत महत्त्वपूर्ण खेळी खेळत अनेक सामने जिंकून दिले आहेत.