क्रीडा

IPL च्या चाहत्यांसाठी नवीन ऑफर, रितेश देशमुखकडून घोषणा

मुंबई : Disney+HotstarVIP ने एक नवीन ऑफर आणली आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि सोनू सूद यांनी त्याची घोषणा केली आहे. रितेश देशमुखनं #FanHitMeinJaari साठी सोनू सूद व Disney+HotstarVIP सोबत करार केला आहे. या ऑफरसह Disney+HotstarVIP च्या नवीन सबस्क्राइबर्सना 12 महिन्यांऐवजी एक महिना अधिक म्हणजेच 13 महिन्यांपर्यंत सर्वोत्तम मनोरंजन व लाइव्ह स्पो्र्टिंग ऍक्शन पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

IPL च्या 13 व्या पर्वाला सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पाच विकेट्स राखून पराभूत केले. कोरोना व्हायरसमुळे यंदाची IPL संयुक्त अरब अमिराती येथे होत आहे आणि प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाही. त्यामुळे आता टिव्ही किंवा अॅप्सवरून IPLचा प्रेक्षक खेचण्याची चढाओढ सुरू झाली आहे.

रितेश देशमुखने एक ट्विट केले असून त्यामध्ये म्हणाला की, ‘सोनू सूदकडून प्रेरणा घेत सर्वांचे भले करण्यामागच्या मूडमध्ये आहे. IPL 2020मुळे सर्वांचा उत्साह वाढला आहे. मुंबईचा माणूस हिटमॅन ( Rohit Sharma) पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी करण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी मला तुमचा आयपीएल पाहण्याच्या आनंदाला अधिक मजेदार बनवायचा आहे.’

#FanHitMeinJaari सह युजर्स सोनू सूद, तसेच रितेश देशमुख, राणा डग्गू’बती, युवराज सिंग यांनी शेअर केलेल्या स्पेशल लिंकमध्ये लॉग ऑन करू शकतात आणि 12 महिन्यांच्या पॅकमध्ये अतिरिक्त 1 महिन्याचा लाभ घेण्यासाठी Disney+HotstarVIP सबस्क्राईब करू शकतात. ही ऑफर आयपीएल 2020 च्या सुरूवातीच्याच वीकेण्डसासाठीच लागू आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत