क्रीडा

…म्हणून धोनीने निवृत्तीसाठी निवडली आजची वेळ

चेन्नई : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने निवृत्ती जाहीर केल्यानंतर काहीवेळातच भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. १५ ऑगस्टच्या दिवशीच महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीने १५ ऑगस्ट म्हणजेच आजच्याच दिवशी निवृत्ती स्वीकारण्यामागील कारणे काय असा प्रश्न सर्वांना पडला असेल. परंतु, त्यापाठीमागे काही खास कारणे आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एक प्रकारे महेद्रसिंह धोनीने निवृत्तीसाठी आजचा दिवस निवडून संपूर्ण मीडियाला क्लिन बोल्ड केले आहे. तसेच धोनी हा एक आर्मीमॅन आहे, त्यामुळे त्याला आजचा दिवस महत्वाचा वाटतो आणि त्याने निवृत्तीसाठी आजच्या दिवसाची निवड केली. त्याचबरोबर, धोनीला नेहमीच माध्यमापासून दूर राहण्याची सवय आहे. त्याचाच विचार करून आज स्वातंत्र्यदिनानिमीत्त सुटी असल्याने आज भारतात वर्तमानपत्र प्रकाशित होत नाही, उद्या वर्तमानपत्रांना सुटी असणार आहे. वर्तमानपत्र छापले जात नसल्याने बातम्या तसेच प्रतिक्रीयांसाठी पत्रकारांचा कुठलाही त्रास नाही. त्यासोबतच तो चेन्नईला पोहोचला असून तो सध्या सुरक्षा कक्षामध्ये चेन्नई सुपर किंगच्या संघासोबत आहे, त्यामुळे त्याला कोणीही बाहेरचे भेटू शकत नाही. कुठलाही निरोप समारंभ नाही, पत्रकार परिषद नाही आणि अगदी हेच हवं होतं महेंद्र सिंह धोनीला आणि त्याने तेच करून दाखवलं आहे.

दरम्यान, आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत.

धोनीच्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्द
एकूण सामने : ५३८
एकूण धावा : १७,२६६
शतकं : १६
अर्धशतकं : १०८
षटकार : ३५९
झेल : ६३४
स्टंपिंग : १९५

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत