क्रीडा

देशात वाढणाऱ्या कोरोनामुळे भारत-इंग्लड क्रिकेट मालिका होणार स्थगीत?

मुंबईः कोरोना व्हायरसचा फटका क्रीडा विश्वाला देखील जोरात बसला आहे, या महामारीच्या काळातील सर्व क्रीडा आयोजने रद्द करावी लागली आहेत. सध्या विशेष परिस्थीमध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाली आहे. पण येत्या काळात भारतीय क्रिकेट संघाची इंग्लडविरुध्द सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या सहा सामन्यांची मालिका तसेच न्यूझिलंड अ संघासोबतचा पुढच्या महिन्यात होणारा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने आजून यासंबंधी औपचारीक घोषणा केली नाही पण लवकरच ती होण्याची शक्यता आहे. इंग्लड विरोधात सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तीन एकदिवसीय तर तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात येणार होते. पण सध्या देशातील परिस्थीती पहाता इंग्लडचा संघ भारताच्या दौऱ्यावर निश्चीतच येऊ शकणार नाही.

भारतात कोरोना व्हायरसचे आजवर जवळपास ९ लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर मृतांचा आकडा हा २५ हजाराच्या जवळ पोहचला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाची स्थीती सप्टेंबर पर्यंत सुधारली तरी देखील इंग्लडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता कमी आहे.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटी होणार इंग्लड दौरा आणि ऑस्ट्रेलिया मध्ये होणार आयसीसी टी २० विश्वचषक स्थगीत होण्याची चिन्हे आहेत. याच कालावधीत भारात होणारी इंडियन प्रीमीअर लीग (आयपीएल) ही स्पर्धा मात्र परदेशात आयोजित केली जाऊ शकते. भारतीय संघाने शेवटचा आंतराष्ट्रीय क्रिकेट सामना मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुध्द खेळला होता. पण तेव्हा देखील ती मालीका कोरोना व्हायरस महामारीमुळे रद्द करण्यात आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत