भारतासाठी नवं आव्हान तयार; पाहा इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक
क्रीडा

भारतासाठी नवं आव्हान तयार; पाहा इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा २-१नं पराभव करत कसोटी मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी पुढचं आव्हान तयार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येत असून पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीनं १८ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. हार्दिक पांड्या आणि इशांत शर्मा यांचं कसोटी सामन्यात पुनरागमन झालं आहे. तर अक्षर पटेल याला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. इंग्लंडचा संघ या मालिकेत ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहेत.

असं असेल इंग्लंडच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक –

५ ते ९ फेब्रुवारी – पहिला कसोटी सामना – चेन्नई
१३ ते १७ फेब्रुवारी – दुसरा कसोटी सामना – चेन्नई
२४ ते २८ फेब्रुवारी – तिसरा कसोटी सामना – अहमदाबाद (दिवस-रात्र)
४ ते ८ मार्च – चौथा कसोटी सामना – अहमदाबाद

१२ मार्च – पहिला टी-२० सामना – अहमदाबाद
१४ मार्च – दुसरा टी-२० सामना – अहमदाबाद
१६ मार्च – तिसरा टी-२० सामना – अहमदाबाद
१८ मार्च – चौथा टी-२० सामना – अहमदाबाद
२० मार्च – पाचवा टी-२० सामना – अहमदाबाद

२३ मार्च – पहिला वन डे सामना- पुणे
२६ मार्च – दुसरा वन डे सामना- पुणे
२८ मार्च – तिसरा वन डे सामना- पुणे