इंग्लंडची पहिल्या क्रमांकावर झेप; भारताची चौथ्या स्थानावर घसरण
क्रीडा

इंग्लंडची पहिल्या क्रमांकावर झेप; भारताची चौथ्या स्थानावर घसरण

चेन्नई : भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाला सामोरं जावं लागंलं. भारतीय संघाचा २२७ धावांनी दारुण पराभव करत इंग्लंड संघानं चार कसोटी सामन्याच्या मालिकेत १-०नं आघाडी घेतली. या पराभवासह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतलं अव्वल स्थान गमावलं आहे. विराट कोहलीची पहिल्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे भारतावर मोठा विजय मिळवत इंग्लंडनं गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार इंग्लंडचा संघ अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर पहिल्या क्रमांकावर असणारा भारताचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. ७० टक्केसह न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी टक्के आहे.

इंग्लंड संघानं ११ विजय आणि चार पराभव स्विकारले आहेत. तर तीन सामने अनिर्णीत राखले आहेत. इंग्लंड संघाच्या नावावर ४४२ पॉईंट असून त्यांची विजयाची टक्केवारी ७०.२ इतकी आहे. भारतीय संघानं ९ विजय मिळवले आहेत. तर चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. एक सामना अनिर्णीत राखला आहे. भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी ६८.३ इतकी आहे.