क्रीडा

भारतीय हॉकी संघाचे माजी हॉकीपटू उस्मान खान यांचे निधन

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू उस्मान खान यांचे कर्करोगामुळे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. हॉकी इंडियाने उस्मान खान यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उस्मान मदरासी आजम मैदानावर हॉकी खेळायचे. त्यानंतर तो कोलकाता येथे शिफ्ट झाले. कोलकाता येथे ते कस्टम सेवेत सामील झाले. उस्मान कोलकाता कस्टमकडून खेळले. बराच काळ त्यांनी राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व केले.

हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोमबाम म्हणाले, डावे विंगर म्हणून उत्कृष्ट क्षमता असलेले खेळाडू म्हणून उस्मान यांची आठवण काढली जाईल. हॉकी इंडियाच्या वतीने आम्ही त्यांच्या कुटूंबीयांबद्दल शोक व्यक्त करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *