क्रीडा

गंभीर म्हणतोय कर्णधार म्हणून धोनीच्या कसोटी क्रिकेटमधील यशामागे झहीर खान!

नवी दिल्लीः भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभार याने महेंद्र सिंह धोनी कर्णधार असतानाच्या कामगीरीविषयी मोठे विधान केले आहे. धोनी हा कर्णधार म्हणून खूप भाग्यशाली होता धोनीला कर्णधार म्हणून मिळालेल्या यश हे वेगवान गोलंदाज झहीर खानमुळे मिळालं आहे असे  मत गंभीरने व्यक्त केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“कसोटी क्रिकेट मध्ये धोनी यशस्वी कर्णधार ठरण्याचं कारण झहीर खान आहे, जहिरसारखा दर्जेदार गोलंदाज मिळणं हे धोनीचं चांगलं नशीब होतं ज्याचं श्रेय़ हे गांगुलीला जातं. माझ्या मते झहीर हा भारताचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज होता” असे मत गंभीरन एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला.

“धोनी भाग्याशाली होता कारण त्याला मुळातच अद्भुत संघ मिळाला होता, २०११ सलचा विश्वकप हा धोनीच्या संघासाठी अत्यंत सोपा होता कारण त्याच्याकडे सचिन, सेहवाग, स्वतः मी, युवराज, युसुफ आणि विराट सारखे खेळाडू होते. त्यामुळे धोनीकडे सर्वश्रेष्ठ संघ होता, त्याउलट गांगुलीला यासाठी अत्यंत मेहनत घ्यावी लागली होती आणि याच कारणामुळे धोनीने भरपुर स्पर्धा जिंकल्या” धोनी कर्णधार असतानाच्या काळात झहीरने भारताकडून ३३ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यमघ्ये त्याने १२३ विकेट मिशवल्या होत्या आणि भारतीय संघाला २००९ साली पहिल्यांदा आयसीसी कोसोटी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहचवण्यात मोठा हातभार लावला होता. गंभीरने धोनीच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकोटमधील यशाची देखील स्तुती केली.

गंभीरने याआधी देखील धोनीचा जयजयकार करणाऱ्या चाहत्यांना खडे बोल सुनावले होते. २०११ साली महेंद्र सिंह धोनी याने षटकार ठोकत मिळवून दिलेल्या विजयाबद्दल गंभीरने नाराजी व्यक्त केली हेती. विश्वकप हा सगळ्या संघाच्या मेहनतीने जिंकला होता कोणच्या एका षटकारामुळे नाही असे मत गंभीरने व्यक्त केले होते. वानखेडे स्टेडीय़मवर श्रीलंका संघासोबत झालेल्या अंतीम सामन्यात कुलसेकराच्या चेंडूवर धोनीच्या षटकाराने भरतीय संघाने विष्वकप आपल्या नावावर केला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत