क्रीडा

ICC T20 Ranking : विराटने मारली बाजी, तर टॉप टेन गोलंदाजात एकाही भारतीयाचा नाही समावेश

नवी दिल्ली : आयसीसीने टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला बढती मिळाली आहे. तर न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्यांची मालिका संपल्यानंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आठव्या स्थानावरुन सातव्या स्थानावर आला आहे. तर के एल राहुल तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तसेच, याव्यतिरीक्त पाकिस्तानविरुद्ध तिन्ही सामन्यात धडाकेबाज खेळी करणाऱ्या सेफर्टच्या क्रमवारीत चांगलीच सुधारणा झाली असून त्याच्या क्रमवारीत २४ स्थानांनी सुधारणा झाली आहे. सेफर्ट नवव्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच फलंदाजाच्या यादीत जरी दोन भारतीय खेळाडू असले तरी गोलंदाजांच्या क्रमवारीत एकाही भारताच्या गोलंदाजाला स्थान मिळालेलं नाही.

फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर इंग्लंडचा डेव्हिड मालन तर दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा बाबर आझम आहे. तर गोलंदाजीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचे बाबर आझम आणि मुजीब रेहमान हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *