क्रीडा

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये फलंदाजीत विराट दुसरा; तर ऑलराऊंडरच्या यादीत जडेजा तिसरा

नवी दिल्ली : बराच काळ कोरोनामुळे क्रिकेट बंद राहिल्यानंतर आयससीसीने टेस्ट क्रिकेटची फलंदाजांची रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंमध्ये फलंदाजाच्या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जडेजा तिसऱ्या स्थानावर आहे. फलंदाजाच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ पहिल्या स्थानावर आहे. फलंदाजाच्या यादीत आणखी दोन फलंदाजांनी टॉप टेनच्या यादीत स्थान मिळवले आहे. चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानी तर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे दहाव्या स्थानी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, पाकिस्तानविरूद्ध दमदार गोलंदाजी करणाऱ्या जेम्स अँडरसनची दीर्घ काळानंतर जागतिक कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत टॉप टेनमध्ये एन्ट्री झाली. पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी धाडत अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा अँडरसन हा जगातील चौथा तर जलदगती गोलंदाजांपैकी पहिलाच खेळाडू ठरला. त्याचसोबतच ताज्या यादीत त्याने ६ स्थानांची झेप घेत आठवे स्थान पटकावले आहे. टॉप १० गोलंदाजांच्या यादीत याव्यतिरिक्त कोणताही बदल झालेला नाही. फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा बेन स्टोक्स स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे क्रमवारीत एका स्थानाने खाली घसरला आहे. दरम्यान गोलंदाजाच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर आहे. तर या यादीत भारताचा एकमेव गोलंदाज आहे. जसप्रित बुमराह नवव्या स्थानी कायम आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतदेखील बेन स्टोक्सला अव्वल स्थान गमवावे लागले आहे. त्याच्याजागी वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने अव्वलस्थान परत मिळवले आहे. याशिवाय इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला एका स्थानाने खाली ढकलत सातवे स्थान पटकावले आहे. भारताचे रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे दोघे अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानी कायम आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत