ICC Test Ranking : अजिंक्य रहाणेला मोठी बढत; तर पुजाराची घसरण
क्रीडा

ICC Test Ranking : अजिंक्य रहाणेला मोठी बढत; तर पुजाराची घसरण

मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांतील कसोटी सामन्यांचा निकाल लागल्यानंतर आयसीसीने वर्षाअखेरीस नवी क्रमवारी जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत चांगलीच सुधारणा झालेली पाहायला मिळाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीतही मोठी सुधारणा झाली असून पाच क्रमांकाची झेप घेत तो क्रमवारीत सहाव्या स्थानी पोहचला आहे, तर चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो दहाव्या स्थानी पोहचला आहे.

ऑस्ट्रेलियाला दोन्ही डावांत अनुक्रमे १९५ आणि २०० धावांत गारद केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आश्वासक कामगिरी केलेली पहायला मिळाली आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजानीही क्रमावारीत मोठी झेप घेतलेली पाहायला मिळाली आहे. रविचंद्रन आश्विनच्या क्रमवारीत दोन अंकांनी सुधारणा झाली असून तो सातव्या स्थानी पोहचला आहे. याचसोबत जसप्रीत बुमराहच्या क्रमवारीत एका अंकाने सुधारणा झाली असून तो नवव्या स्थानी पोहचला आहे.

पाकिस्तानावर विजय मिळवल्यावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला फायदा झाला असून त्याने स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांना मागे टाकून पहिलं स्थान पटकावलं. ८९० गुणांसह विल्यमसन पहिल्या स्थानावर असून स्मिथ पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.