रोहित शर्मा कर्णधार; तर हे तीनजण उपकर्णधार पदाचे दावेदार?
क्रीडा

रोहित शर्मा कर्णधार; तर हे तीनजण उपकर्णधार पदाचे दावेदार?

मुंबई : टी 20 विश्वचषकानंतर विराट कोहली भारतीय टी -20 संघाचं कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. आता या पदासाठी हिटमॅन रोहित शर्मा हा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यानंतर आता उपकर्णधार पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार उपकर्णधार पदाच्या शर्यतीत 3 युवा खेळाडू आहेत. यात के एल राहुल, ऋषभ पंत और जसप्रीत बुमराह यांच्या नावाची चर्चा आहे. आयपीएलच्या या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद भूषवणाऱ्या ऋषभ पंतने आपली नेतृत्व क्षमता दाखवली आहे. आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल जिंकण्यात यशस्वी झाला तर पंतला टीम इंडिया उपकर्णधार पदाची लॉटरीही लागू शकते.

पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल देखील टी -20 संघाच्या उपकर्णधारपदासाठी मोठा दावेदार आहे. केएल राहुलची फलंदाजी पाहता तो जास्त काळ भारतीय संघात खेळू शकतो. राहुलमध्ये पुढील 4 ते 5 वर्षे तीनही फॉरमॅटमध्ये खेळण्याची क्षमता आहे.