INDvsAUS : अवघ्या ३६ धावांत भारताचा संघ गारद; कांगारूंना ९० धावांचे आव्हान
क्रीडा

INDvsAUS : अवघ्या ३६ धावांत भारताचा संघ गारद; कांगारूंना ९० धावांचे आव्हान

ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने खूप खराब कामगिरी केली. संपूर्ण संघ अवघ्या ३६ धावांत गारद झाला आहे. भारतीय संघातील एकाही फलंदाजाला दोनअंकी संख्या गाठता आली नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑस्ट्रेलियाकडून जॉस हेजलवूडने 5 तर पॅट कमिन्सने 4 विकेट घेतल्या. भारताकडून चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन शून्यावर बाद झाले. तर पृथ्वी शॉ 4, मयंक अगरवाल 9, जसप्रीत बुमराह 2, विराट कोहली 4, हनुमा विहारी 8 रन, ऋद्धीमान साहा 4 धावावर बाद झाले. तर मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाला. भारताचा संपुर्ण संघ 36 धावावर ऑल आऊट झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 90 धावांचं आव्हान मिळालं आहे.

टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताने पहिल्या इनिंगमध्ये 244 रन केले यानंतर भारताच्या बॉलरनी दिमाखदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 191 रनवर ऑल आऊट केला, त्यामुळे भारताला 53 रनची आघाडी मिळाली होती.