IND vs ENG 3rd Test : अशी असेल भारताची संभाव्य Playing XI
क्रीडा

IND vs ENG 3rd Test : अशी असेल भारताची संभाव्य Playing XI

हेंडिग्ले : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बुधवारपासून तिसरी टेस्ट हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये Playing XIमध्ये कुणाचा समावेश करायचा याबाबत संघ व्यवस्थापनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या टेस्टसाठी शार्दुल ठाकूर फिट असल्याचं व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेनं जाहीर केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अजिंक्यनं सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘शार्दुल ठाकूर फिट असून आता निवडीसाठी उपलब्ध आहे. आम्हाला आता पुरेसा ब्रेक मिळाला आहे. भारतीय बॉलर्समध्ये निवडीसाठी स्पर्धा आहे. सर्व फास्ट बॉलर्स खेळण्यासाठी सज्ज असून हा चांगला संकेत आहे.’ शार्दुलच्या अनुपस्थितीमध्ये इशांत शर्माचा लॉर्ड्स टेस्टमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानं 16.40 च्या सरासरीनं 5 विकेट्स घेत चांगली कामगिरी केली होती. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनीही लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भेदक मारा केला होता. त्यांच्या भेदक बॉलिंगमुळे इंग्लंडची टीम पाचव्या दिवशी दोन पूर्ण सेशन खेळू शकली नाही. त्यांच्या या कामगिरीमुळे शार्दुल ठाकूरला या सीरिजमध्ये पुन्हा खेळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.

हेंडिग्लेमधील हवामान देखील शार्दुलच्या निवडीसाठी प्रतिकूल आहे. या टेस्टच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता 10 टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे हवामान बहुतेक काळ कोरडे राहणार आहे. हे पिच फ्लॅट असेल तर त्यावर तीन फास्ट आणि दोन स्पिन बॉलर खेळवणे अधिक योग्य ठरेल असा सल्ला मायकल होल्डिंगनं दिला आहे. अर्थात आम्ही टीमच्या निवडीबाबत फार काळजीमध्ये नाही, असं अजिंक्यनं स्पष्ट केलं आहे.

टीम इंडियाची संभाव्य Playing XI: केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर/इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह