क्रीडा

WTC Final : अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाकडून अंतिम ११खेळाडूंची घोषणा

नवी दिल्ली : शुक्रवार १८जूनपासून भारत आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये भारताकडून कोणत्या ११खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल, याविषयी बरीच चर्चा सुरू होती. अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय संघाच्या अंतिम ११खेळाडूंची घोषणा केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यामध्ये अपेक्षेप्रमाणे रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला असून मोहम्मद सिराजला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. बीसीसीआयनं जाहीर केलेली भारताची प्लेइंग इलेव्हन पुढीलप्रमाणे असणार आहे.

विराट कोहली (कर्णधार)
अजिंक्य रहाणे (उपकर्णधार)
रोहित शर्मा
शुभमन गिल
चेतेश्वर पुजारा
ऋषभ पंत
रविचंद्रन अश्विन
रविंद्र जाडेजा
जसप्रीत बुमराह
इशांत शर्मा
मोहम्मद शमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *