ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी, ज्युडो, टेटे आणि तिरंदाजीने केली भारताची निराशा
क्रीडा

ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी, ज्युडो, टेटे आणि तिरंदाजीने केली भारताची निराशा

टोकियो : जपानच्या नॅशनल स्टेडियमवर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन झाले. मात्र, ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताची कामगिरी निराशाजनक ठरली. चीनची युवा नेमबाज यांग किआनने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक जिंकले. भारताचे अव्वल नेमबाज अपूर्वी चंडेला आणि इलेव्हनिल वलारीवन यांना या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. रशियाच्या अनास्तासिया गलाशिनाने रौप्य तर स्वित्झर्लंडच्या नीना क्रिस्टनने कांस्यपदक जिंकले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टोकियो ऑलिम्पिकमधील ज्युडो स्पर्धेत भारताच्या सुशीला देवीला आपला पहिला सामना गमावलाल आहे. ४८ किलो वजनाच्या एलिमिनेशन फेरीत सुशीलाची लढत हंगेरीच्या इवा कार्नोस्कीशी होती. मात्र तिला पराभवाचा धक्का पचवावा लागला. या स्पर्धेत सुशीला भारताची एकमेव उमेदवार होती. दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव यांच्या भारतीय तिरंदाजी मिश्र संघाने चायनीज ताइपेच्या लिन चिया-एन आणि तांग चिह-चुन या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारतीय जोडीने ५-३ अशा फरकाने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केल. दीपिका-प्रवीणचा पुढच्या फेरीत दक्षिण कोरियाशी सामना होणार आहे. टायब्रेकर जिंकण्यासाठी भारतीय जोडीला पर्फेक्ट १० गुणांची आवश्यक होती.

टोकियो ऑलिम्पिकच्या मिश्र दुहेरी प्रकारातील टेबल टेनिसच्या अंतिम-१६ फेरीत भारताची अचंता कमल आणि मनिका बत्रा ही जोडी पराभूत झाली. या ऑलिम्पिक स्पर्धेतील बत्रा आणि कमलचा हा पहिला सामना होता. तैवान लिन यू तझू आणि चेंग चिंग या जोडीने बत्रा-कमलचा ४-० असा पराभव केला.