दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा दारूण पराभव; मालिका १-१ अशी बरोबरीत
क्रीडा

दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा दारूण पराभव; मालिका १-१ अशी बरोबरीत

अहमदाबाद : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने पाहुण्या इंग्लंड संघाचा दारुण पराभव केला आहे. दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका आता १-१ अशी बरोबरीत असून उर्वरित ३ सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लडने दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली. आघाडीचा फलंदाज के एल राहुल शुन्यावर बाद झाल्याने, भारतीय संघाला पहिला मोठा झटका बसला. तेव्हा भारतीय संघाने देखील आपलं खातं उघडलं नव्हतं. पहिल्या षटकात भारतला एकही धाव काढता आली नाही. सॅम करन याने के एल राहुलला बाद केलं. जोस बटलरने त्याचा यष्टीमागे झेल टिपला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि इशान किशन यांनी डावाला सावरलं.

सहा षटकांत त्यांनी ५० धावांची भागीदारी केली. इशान किशनने स्फोटक फलंदाजी करत २८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर भारतीय संघाची १० षटकात ९४ धावासंख्या असताना इशान किशन ३१ चेंडूत ५६ धावा काढून बाद झाला. आदिल रशीदने त्याला एलबीडब्ल्यू बाद केलं. यानंतर धावसंख्या १३० असताना १३ व्या षटकात रिषभ पंत १३ चेंडूत २६ धावा काढून झेल बाद झाला. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या षटकात जॉनी बेअरस्टोने त्याचा झेल टिपला व भारताचा तिसरा गडी बाद झाला. कर्णधार विराट कोहलीने कर्णधाराला साजेसी खेळी करत ४९ चेंडूत ७३ धावा केल्या.

भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात काही बदल करण्यात आले असून, त्यानुसार शिखर धवन आणि अक्षर पटेलला संघामधून वगळण्यात आलेलं आहे. त्यांच्या जागी इशान किशन आणि सूर्यकुमार यांना संधी देण्यात आलेली आहे. या मालिकेत इंग्लड १-० ने आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात इंग्लडने भारतावर आठ गड्यांनी विजय मिळवला होता.

तत्पूर्वी, इंग्लडच्या फलंदाजीला सुरूवात झाली तेव्हा, भुनवनेश्वर कुमारने बटलरला भोपळाही न फोडू देता बाद करत इंग्लडला पहिला झटका दिला. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर भुवनेश्वरने जोस बटलरला एलबीडब्ल्यू आउट केलं. तेव्हा इंग्लडचा धावसंख्या अवघी १ होती. त्यानंतर इंग्लडची धावसंख्या ६४ असताना यजुर्वेंद्र चहलने आठव्या षटकामध्ये डेव्हिड मलानला(२४) एलबीडब्ल्यू बाद करून इंग्लडला दुसरा धक्का दिला. तर, इंग्लडची धावसंख्या ९१ असताना वॉशिंग्टन सुंदरने ११ व्या षटकामधील पहिल्या चेंडूवर जेसन रॉयला(४६) बाद केलं.

भुवनेश्वर कुमारने रॉयचा झेल घेतल्याने इंग्लडचा तिसरा गडी बाद झाला. यानंतर इंग्लडची धावसंख्या ११९ असताना १३ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने जॉनी बेअरस्टोला(२०) सूर्यकुमार यादवकडे झेल देण्यास भाग पाडले आणि इंग्लडला चौथा झटका बसला. तर, इंग्लडची धावसंख्या १४२ असताना १७ व्या षटकात शार्दूल ठाकूरने ईऑन मॉर्गनला(२८) बाद केलं, ऋषभ पंतने त्याचा झेल टिपला. यानंतर शार्दूल ठाकूरने टाकलेल्या २० षटकात बेन स्टोक्सचा(२४) हार्दिक पंड्याने झेल घेतला इंग्लडचा सहावा गडी एकूण धावसंख्या १६० असताना तंबूत परतला. यानंतर सॅम करन व ख्रिस जॉर्डन हे नाबाद राहिले. २० षटकांमध्ये सहा गडी गमावून इंग्लडची एकूण धावसंख्या १६४ झाली.