INDvsAUS : तब्बव ४६ वर्षांनंतर भारतीय संघावर ओढावली ही नामुष्की
क्रीडा

INDvsAUS : तब्बव ४६ वर्षांनंतर भारतीय संघावर ओढावली ही नामुष्की

अॅडिलेड : पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाने लाजिरवाणी कामगिरी केली आहे. ४६ वर्षानंतर स्वतःचाच नकोसा विक्रम भारतीय संघाने मोडीत काढला आहे. पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांत संपुष्टात आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हेजलवूड आणि कमिन्सच्या धारधार गोलंदाजीपुढे भारतीय संघातील दिग्गज एकापाठोपाठ माघारी परतले. दुसऱ्या दिवसाअखेरीस १ बाद ९ वर डाव संपवलेल्या भारताकडे ६२ धावांची आघाडी होती. मात्र तिसऱ्या दिवसाच्या खेळात कांगारुंच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजीचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. दुसऱ्या डावांत भारतीय संघाला ९ गड्यांच्या मोबदल्यात ३६ धावांपर्यंत मजल मारता आली.

भारताच्या या खराब फलंदाजीमुळे ४६ वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रमही आज तुटला आहे. १९७४ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं ४२ धावांची निच्चांकी धावसंख्या उभारली होती. आता ४६ वर्षांनंतर भारतानं हा लाजीरवाणा विक्रम मोडला आहे.