World Test Championship : ऑस्ट्रेलियाला खाली खेचत भारत अव्वल
क्रीडा

World Test Championship : ऑस्ट्रेलियाला खाली खेचत भारत अव्वल

ब्रिस्बेन : पाचव्या कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा तीन गड्यांनी पराभव करत बॉर्डर गावसकर कसोटी मालिका २-१नं खिशात घातली आहे. या ऐतिहासिक विजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या तीन संघामध्ये पहिल्या दोन संघामध्ये स्थान मिळवण्याची टक्कर आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ब्रिस्बेन कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार भारतीय संघ अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर पहिल्या क्रमांकावर असणारा ऑस्ट्रेलियाच्या संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. कसोटी मालिकाते पराभव स्विकारावा लागल्यानंतर गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची घसरण झाली.

आतापर्यंत भारतीय संघानं पाच कसोटी मालिकेत ९ विजय आणि तीन पराभव स्वीकारलं आहेत. तर एक सामना अनिर्णित राखला आहे. त्यामळे भारतीय संघाच्या नावावर ४३० गुण असून विजयाची टक्केवारी ७१.७ इतकी आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघानेही पाच कसोटी मालिका खेळल्या आहेत. न्यूझीलंडला सात सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागाल आहे. न्यूझीलंडच्या विजयाची टक्केवारी ७० इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियानं ८ सामन्यात विजय तर ४ सामन्यात पराभव स्विकारावा लागाला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६९ इतकी आहे.