टी-२० मालिका विजयानंतर भारतीय संघावर कारवाई
क्रीडा

टी-२० मालिका विजयानंतर भारतीय संघावर कारवाई

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिका विजयानंतर भारतीय संघावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय संघाने ५ सामन्यांची मालिका ३-२ अशी जिंकल्यावर भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याबद्दल भारतीय संघाला मानधनाच्या 40 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सामन्यात निर्धारित वेळेत भारतीय संघाने दोन षटके कमी टाकली. त्यानंतर आयसीसीच्या एलिट पॅनेलचे मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी भारतावर दंड ठोठावला. भारतीय संघाला आयसीसीच्या कलम 2.22 अंतर्गत दंड ठोठावण्यात आला आहे.

संघाचा कर्णधार विराट कोहलीने संबंधित कारवाई मान्य केली आहे. त्यामुळे याप्रकरणी अधिक सुनावणीची गरज नसल्याचे आयसीसीने सांगितले आहे. मैदानातील पंच अनिल चौधरी आणि नितीन मेनन आणि तिसरे पंच के.एन. अनंतपद्मनाभन यांनी भारतीय संघावर कारवाई केली.