इंग्लंडकडे मोठी आघाडी; भारताचा दुसरा डाव ३३७ धावांवर आटोपला
क्रीडा

इंग्लंडकडे मोठी आघाडी; भारताचा दुसरा डाव ३३७ धावांवर आटोपला

चेन्नई : पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडला पहिल्या डावानंतर मोठी आघाडी मिळाली आहे. भारतीय संघाचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला असून ५७९ धावांचा पाठलाग करताना भारताच्या खराब फलंदाजीमुळे इंग्लंडला पहिल्या डावाअखेर २४१ धावांची मोठी आघाडी मिळाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला किमान तीनशेपार मजल मारता आली. इतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवणार होती, पण इंग्लंडच्या कर्णधाराने तो पर्याय नाकारत पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड दुसऱ्या डावात फलंदाजी आल्यानंतर उपहाराच्या विश्रांतीआधी केवळ २ षटकं टाकण्यात आली. त्यात इंग्लंडला केवळ १ धाव करता आली तर अश्विनने डावाच्या पहिल्याच चेंडूवर रॉरी बर्न्सला शून्यावर माघारी धाडलं.

रोहित शर्मा (६), शुबमन गिल (२९), विराट कोहली (११) आणि अजिंक्य रहाणे (१) हे चार वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर संयमी चेतेश्वर पुजारा आणि धडाकेबाज ऋषभ पंत यांनी भारताचा डाव सावरला. चेतेश्वर पुजाराने ११ चौकारांसह ७३ धावा केल्या. तर ऋषभ पंतने ९ चौकार आणि ५ षटकारांसह ९१ धावा केल्या. त्यांच्यानंतर आलेल्या वॉशिंग्टन सुंदरनेदेखील अर्धशतकी खेळी केली. अश्विनच्या साथीने त्याने संघाला ३००चा टप्पा पार करून दिला. अश्विन ३१ धावा केल्या. पण नंतर सुंदरला कोणाचीही दीर्घ साथ मिळाली नाही. सुंदरने १२ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ८५ धावा केल्या.