तिसऱ्या वनडेसाठी झोप मोड होणार; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार लाइव्ह स्ट्रीमिंग
क्रीडा

तिसऱ्या वनडेसाठी झोप मोड होणार; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार लाइव्ह स्ट्रीमिंग

क्राइस्टचर्च: भारतीय क्रिकेट संघाचा उद्या न्यूझीलंड (India vs New Zealand) दौऱ्यातील शेवटचा दिवस आहे. दोन्ही संघात वनडे मालिकेतील तिसरी आणि अखेरची मॅच उद्या होणार आहे. मालिकेतील पहिली मॅच न्यूझीलंडने जिंकली आहे. तर दुसरी लढत पावसामुळे रद्द झाली. आता तिसऱ्या लढतीवर मालिकेचा निकाल ठरणार आहे. एका बाजूला न्यूझीलंडचा संघ मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल तर दुसऱ्या बाजूला भारत मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्न करेल. याआधी झालेल्या टी-२० मालिकेत भारताने १-० असा विजय मिळवला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी लढत कधी होणार आहे?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी लढत बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी होईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी मॅच कुठे होणार आहे?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी मॅच क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानावर होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी मॅच किती वाजता सुरू होईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी मॅच भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजता सुरू होईल. या सामन्यासाठीचा टॉस भारतीय वेळेनुसार ६ वाजून ३० मिनिटांनी होईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी मॅचचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसऱ्या लढतीचे लाइव्ह स्ट्रीमिंग अमेझॉन प्राइमवर पाहू शकता.