सकाळी पाऊस, आता ऊन-सावल्यांचा खेळ सुरु, दुसरा टी-२० पण हवामानामुळे रद्द होणार का; जाणून घ्या अपडेट
क्रीडा

सकाळी पाऊस, आता ऊन-सावल्यांचा खेळ सुरु, दुसरा टी-२० पण हवामानामुळे रद्द होणार का; जाणून घ्या अपडेट

माऊंट माऊनगाऊई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आता लवकरच माउंट माऊनगाऊई येथे खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने संपूर्ण जगाचे लक्ष सामन्याकडे लागले आहे. हवामान चांगले राहावे, अशी प्रार्थना केली जात आहे. पावसाने पुन्हा गोंधळ घालू नये आणि पूर्ण २० षटकांचा सामना बघायला मिळावा, अशी सर्वच चाहत्यांची अपेक्षा आहे. पण आजच्या हवामानाचा नेमका अंदाज काय आहे, पाहूया.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कधी ऊन कधी पाऊस

न्यूझीलंडमधील रिपोर्टनुसार, माऊंट माऊनगाऊईमध्ये वातावरण लपंडाव खेळत आहे. कधी पाऊस सुरू होतो, मग काही वेळाने सूर्यप्रकाश पडतो. पावसाचा जोर वाढत नाही ही दिलासादायक बाब आहे. हलका पाऊस पडत आहे, परंतु जमीन कोरडी होण्यापासून रोखण्यासाठी ते पुरेसे आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सामन्यादरम्यान पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. पाऊस पडण्याची पूर्ण शक्यता आहे.

आजचा सामनाही रद्द होणार का?

हवामानाच्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान तापमान १५-२१ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. बहुतांशी ढगाळ वातावरण राहील. सकाळी हलक्या सरी येतील, या हलक्या सारी येऊन गेल्या आहेत. आता दुपारनंतरही पावसासह जोरदार वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, जो यावेळीही सुरू आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता म्हणजेच भारतातील प्रमाणवेळेनुसार दुपारी १२ वाजता सुरू होईल आणि या वेळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कमी षटकांचा खेळ होऊ शकतो.

हवामानानुसार संभाव्य अंतिम अकरा

दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता पाहता भारताला आपली प्लेइंग इलेव्हन विचारपूर्वक बनवावी लागेल. भारताने दोन फिरकी गोलंदाजांऐवजी अतिरिक्त वेगवान गोलंदाज घेऊन जाणे पसंत केले पाहिजे. अशा स्थितीत उमरान मलिकलाही आज प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते. हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज यांचाही संघात समावेश आहे. कर्णधार हार्दिक पांड्याकडे भरपूर पर्याय आहेत.