आयपीएल होणार आणखी मोठी; आयसीसीकडून मान्यता
क्रीडा

आयपीएल होणार आणखी मोठी; आयसीसीकडून मान्यता

मुंबई : बीसीसीआयने आयपीएलसाठी जास्त कालावधी सोडण्याच्या अटीवर आयसीसीचा निर्णय मान्य केला आहे. पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 टीम खेळतील, त्यामुळे आयपीएलसाठी आणखी जास्त कालावधीची गरज पडणार आहे. 1 जूनला झालेल्या बैठकीनंतर आयसीसीने 2023 ते 2031 च्या फ्युचर टूर प्रोग्रामची घोषणा केली होती, त्यानुसार आयसीसी प्रत्येक वर्षी एका स्पर्धेचं आयोजन करणार आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार याचा विरोध करणारे बीसीसीआय, इंग्लंड क्रिकेट बोर्ड तसंच क्रिकेट ऑस्ट्रेलियाही आता यासाठी तयार झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

2019 सालीही आयसीसीने प्रत्येक वर्षी एक स्पर्धा खेळवण्याबाबत मत मांडलं होतं, पण तेव्हा सौरव गांगुलीने याला विरोध केला होता. फिफा प्रत्येक चार वर्षानंतर स्पर्धा खेळवते, त्यामुळे आयसीसीने या मूर्खपणापासून वाचलं पाहिजे. हा निर्णय आयसीसीला घ्यायचा आहे, पण मी बैठकीत माझं मत मांडेन, असं गांगुली म्हणाला होता. आयपीएलमध्ये सध्या 8 टीम आहेत, या टीममध्ये 52-54 दिवसात 60 मुकाबले होतात. पण जर पुढच्या मोसमात टीमची संख्या 8 वरून वाढवून 10 केली तर 94 सामने होतील. तसंच जर टीमना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं तर 76 मॅच खेळवाव्या लागतील. यासाठी बीसीसीआयला कमीत कमी 15 ते 20 जास्त दिवस लागतील. त्यामुळे परदेशी क्रिकेटपटू उपलब्ध करणं टीमसाठी मोठी अडचण ठरेल. या कारणामुळे बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात सहमती झाली आहे.

ब्रॉडकास्टरनीही आयसीसी आणि बीसीसीआयच्यामध्ये झालेल्या या सहमतीवर समाधान व्यक्त केलं आहे. आयपीएलचा यंदाचा मोसमत 4 मे रोजी कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आला. आता उरलेले 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये होणार आहेत. आयसीसीच्या नव्या कॅलेंडरनुसार 2027 आणि 2031 साली वनडे वर्ल्ड कप होईल, ज्यात 14 टीम सहभागी होतील आणि एकूण 54 सामने होतील.