इशानने जिंकली मने; सामनावीराचा पुरस्कार या व्यक्तीला केला समर्पित
क्रीडा

इशानने जिंकली मने; सामनावीराचा पुरस्कार या व्यक्तीला केला समर्पित

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर राहुल शून्यावर बाद झाला आणि टीम इंडियाला मोठा झटका बसला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पदार्पणातच आव्हानात्मक धावसंख्या पार करण्याचे आव्हान इशान किशनकडे होते. सोबत अनुभवी आणि दिग्गज असा विराट कोहली होता. सर्वांचे लक्ष्य विराट कसा खेळेल याकडे असताना इशानने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इशानने विराट कोहली सोबत फक्त ५६ चेंडूत ९४ धावांची भागिदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने ३२ चेंडूत धमाकेदार ५६ धावा करत सामनावीर पुरस्कार पटकावला. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक करणारा तो दुसरा भारतीय ठरला. भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या इशानने फक्त देशाला विजय मिळवून दिला नाही तर एक अशी कृती केली ज्याने सर्व चाहत्यांचे मन जिंकले. इंग्लंडविरुद्ध भारताचा कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद ७३ धावा केल्या. सामनावीर पुरस्कार त्याला मिळेल असे वाटले होते. पण पदार्पणात शानदार शतक करून संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या इशांतची निवड या पुरस्कारासाठी केली गेली. पदार्पणात सामनावीर पुरस्कार मिळवणारा तो सातवा भारतीय ठरला.

त्यानंतर त्याने सामनावीर पुरस्कार एका खास व्यक्तीला समर्पित केला. इशानने त्याच्या प्रशिक्षकांच्या वडिलांना समर्पित केला. त्यांचे काही दिवासंपूर्वी निधन झाले होते आणि माझी आजची खेळी ही त्यांच्यासाठी होती असे इशान म्हणाला. सामन्याआधी प्रशिक्षक म्हणाले होते की, माझ्या वडिलांसाठी तुला किमान अर्धशतक करावे लागले. त्यामुळे हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो. इशानच्या या कृतीने सर्व क्रिकेट चाहत्याचे मन जिंकले. सोशल मीडियावर त्याच्या या कृतीचे सर्वजण कौतुक करत आहेत.