इशांतची मोठी कामगिरी; कपिल, जहीरनंतर अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज
क्रीडा

इशांतची मोठी कामगिरी; कपिल, जहीरनंतर अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज

चेन्नई : इंग्लंडविरुद्ध चेन्नईत सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इशांत शर्माने मोठी कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मानं कसोटी सामन्यात ३०० बळी घेण्याचा कारनामा केला आहे. असा पराक्रम करणारा इशांत तिसरा वेगवान भारतीय गोलंदाज ठरला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लंडविरोधात चेन्नई येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना इशांत शर्मानं लॉरेन्सला बाद करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंग्लंडविरोधातील मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी इशांतच्या नावावर ९७ कसोटी सामन्यात २९७ बळींची नोंद होती. चेन्नई कसोटी सामन्यातील पिहल्या डावात इशांत शर्मानं दोन बळी घेतले. तर दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला विकेट मिळवत ३०० बळींचा पल्ला पार केला आहे.

इशांत शर्मानं ९८ व्या कसोटी सामन्यात ३०० बळी घेतेले आहेत. इशांत शर्माआधी कपिल देव आणि झहीर खान या दिग्गजांनी कसोटी सामन्यात ३०० बळी घेतले आहेत. ३०० पेक्षा जास्त विकेट घेणारा इशांत शर्मा सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

३०० बळी घेणारे भारतीय गोलंदाज
कपिल देव (४३४)
जहीर खान (३११)
अनिल कुंबले (६१९)
हरभजन सिंह (४१७)
रविचंद्रन अश्विन (३६५)