सातव्या क्रमांकावर येत अर्धशतकी खेळीसह जडेजाने केला मोठा विक्रम
क्रीडा

सातव्या क्रमांकावर येत अर्धशतकी खेळीसह जडेजाने केला मोठा विक्रम

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान रविंद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्या या जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद दीड शतकी भागीदारी करत भारताला ३०० पार धावसंख्या पार करुन दिली. ५ बाद १५२ अशी परिस्थिती असताना जाडेजा आणि पांड्या यांनी सुरुवातीला सावध खेळ करत मैदानावर पाय रोवले. यानंतर अखेरच्या षटकांमध्ये कांगारुंची धुलाई करत दोन्ही फलंदाजांनी खोऱ्याने धावा वसूल केल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रविंद्र जाडेजाने ५० चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६६ धावा केल्या. या धडाकेबाज अर्धशतकी खेळाच्या जोरावर रविंद्र जाडेजाने एक नवा विक्रम केला आहे. जडेजाचे नाव आता कपिल देव यांच्या यादीत घेतलं जाणार आहे. वन-डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत असताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जडेजाला स्थान मिळालं आहे. माजी कर्णधार कपिल देव या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.

याचसोबत तब्बल ७ वर्षांनी रविंद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर वन-डे क्रिकेटमध्ये भारताच्या तळातल्या फलंदाजांची ताकद दाखवून दिली. हार्दिक पांड्यानेही दुसऱ्या बाजूने आक्रमक खेळी करत भारतीय संघाची पडझड होणार नाही याची काळजी घेतली. हार्दिकने ७६ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ९२ धावा केल्या.