रोहितनंतर बुमराहची मलिंगासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…
क्रीडा

रोहितनंतर बुमराहची मलिंगासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…

मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानंतर जसप्रित बुमराहने संघाचा माजी खेळाडू लसिथ मलिंगासाठी भावनिक पोस्ट लिहली आहे. भारताची आगामी क्रिकेट मालिका इंग्लंडविरूद्ध मायदेशातच असणार आहे. त्यानंतर IPLच्या पुढील हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सर्व संघांनी आपल्या संघातील करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं बीसीसीआयला दिली. त्यात मुंबईच्या संघाने लसिथ मलिंगाला करारमुक्त केले. मलिंगाने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने त्याला करारमुक्त करण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यानंतर बुमराहने ट्विट करत आपल्या भावनांना वाट करून दिली. इतक्या वर्षे तुझ्या साथीने क्रिकेटच्या मैदानावर खेळलो याचा मला अभिमान आहे. तुझी विचार करण्याची शैली तू मला शिकवलीस त्यासाठी तुझे खूप आभार, माली (मलिंगा). तुझ्या समृद्ध अशा कारकिर्दीतसाठी तुझं अभिनंदन. आता तू नसल्याने आयपीएलमधील गोष्टी पूर्वीसारख्या नसतील, असा भावनिक ट्विट त्याने आपल्या अकाऊंटवरून केले.

IPL2021साठी आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाने श्रीलंकेचा तेज गोलंदाज लसिथ मलिंगाला बाय-बाय केला आहे. मलिंगासोबत मिचेल मॅक्लेनेघन यांसारख्या बड्या नावांना सोडचिठ्ठी दिली. तर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट या मॅचविनर खेळाडूंना संघात कायम राखले आहे.

IPL 2020मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. कोणत्याही संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पाच वेळा पटकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तसेच सलग दोन वर्षे स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरणारा चेन्नईनंतर मुंबई केवळ दुसरा संघ ठरला. मुंबईच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०१९ आणि २०२० अशी दोन्ही विजेतेपदे सलग जिंकली. मुंबईकडून अनेक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. पण काही खेळाडूंना संधी मिळू शकली नाही.