क्रीडा

कोरोना सुरक्षा प्रोटोकॉल मोडल्याने इंग्लडच्या जोफ्रा आर्चरला संघातून वगळलं

मॅनचेस्टरः इंग्लडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला क्रिकेट सामन्यादरम्यान घालून दिलेल्या ‘बायो सेक्यूरीटी प्रोटोकॉल’चे उल्लघन केल्यामुळे वेस्ट इंडिज सोबत खेळण्यात येणाऱ्या दुसऱ्या कोसीटी सामन्यास मुकावे लागणार आहे. कोरोना महामारीपासुन बचावासाठी घातलेले सुरक्षचे नियम मोडल्याने आर्चरला संघातून बाहेर करण्यात आले आहे. आता त्याला पाच दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये राहवे लागणार असून याकालावधीमध्ये दोन वेळा कोविड १९ तपासणी करावी लागणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या कोरोना व्हायरस जगभरात थैमान गालत असतान विशेष नियमांचे पालन करत इंग्लडविरुध्द वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालीका खेळण्यात येत आहे. मागच्या ११७ दिवसनंतर आंतराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा खेळले जात आहे.

इंग्लड क्रिकेट बोर्डाने प्रसिध्द केलेल्या निवेदनामध्ये  इंग्लडच्या जोफ्रा आर्चरने bio-security चे उलंघन केल्याने, वेस्ट इंडिज विरुध्द आज ओल्ड ट्रैफर्ड मध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीच्या संघातून आर्चरला बाहेर करण्यात आले आहे अशी माहिती देण्यात आली दिली.

अर्चरने दोन्ही संघाच्या आरोग्यासाठी अवश्यक असलेली काळजी न घेतल्याबद्दल माफी मागीतली आहे, तसेच संगाला गरज असताना खेळू शकत नसल्याचे दुखः व्यक्त केले आहे.  इंग्लडच्या संघाने पहिला सामना चार विकेटने गमवल्यानंतर इंग्लट मालिकेत १-० ने पिछाडीवर पडला आहे पण सध्या इंग्लाडच्या संघाला अर्चरची अत्यंत गरज आहे. आर्चरने इंग्लडच्या संघाकडून आजवर आठ कसोटी सामने खेळले आहेत, तसेच १४ वनडे आणि एक टी२० आंतराष्ट्रीय सामना खेळाला आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेतुन आंतरराष्ट्रीय क्रिकेट ११७ दिवसांनंतर पुन्हा सुरु झाले आ

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत