सहा चेंडू सहा षटकार; पोलार्डची युवराज गिब्ससोबत बरोबरी
क्रीडा

सहा चेंडू सहा षटकार; पोलार्डची युवराज गिब्ससोबत बरोबरी

मुंबई : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार कायरन पोलार्डने धडाकेबाज खेळी केली. भारताचा खेळाडू युवराज सिंह आणि दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्स यांच्यासोबत बरोबरी करत सहा चेंडूत सहा षटकार लगावले आहेत. युवराज आणि गिब्स दोघांनाही एकाच षटकामध्ये सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. युवराजने टी-२० तर गिब्सने एकदिवसीय सामन्यांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर नोंदवलेला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिज संघाने सहज विजय मिळवला. ४१ चेंडू आणि चार गडी राखत वेस्ट इंडिजच्या संघाने सामना खिशात घातला. विंडिजकडून पोलार्डने अकीला धनंजयच्या एका षटकामध्ये सहा षटकार लगावले.

पोलार्डने विंडीज संघाची फलंदाजी सुरु असतानाच पाचव्या षटकामध्येच हा पराक्रम करत विक्रमी कामगिरी केली. पोलार्डने ११ चेंडूमध्ये ३८ धावांची खेळी केली. यामध्ये सहा चेंडूत सहा षटकांरांचा समावेश होता. विशेष गोष्ट म्हणजे पोलार्डने हे सहाही षटकार मैदानाच्या वेगवेगळ्या दिशांना मारण्याऐवजी सरळ मारले. पोलार्डने युवराज सिंगच्या टी-२० मधील विक्रमाची बरोबर केली आहे. तब्बल १४ वर्षांनंतर कोणत्याही खेळाडूला या विक्रमाची बरोबर करण्यात यश मिळालं आहे. सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावणारा पोलार्ड हा पहिलाच वेस्ट इंडियन खेळाडू ठरला आहे.

https://twitter.com/KirketVideoss/status/1367278365087047680

वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका सामन्यामध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ९ गड्यांच्या मोबदल्यात १३१ धावा केल्या. वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी १३२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. वेस्ट इंडिजच्या संघाने १३.१ षटकांमध्येच सहा गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावा करत सामना चार गाडी राखून जिंकला.