के एल राहुलचा शतकांसह मोठा विक्रम; विराट, धवनला टाकले मागे
क्रीडा

के एल राहुलचा शतकांसह मोठा विक्रम; विराट, धवनला टाकले मागे

पुणे : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात के एल राहुलने जबरदस्त शतक ठोकत 108 धावांची संयमी खेळी केली. शतकाव्यतिरिक्त त्याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सर्वात कमी डावात 1500 धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत राहुलने विराट कोहलीला मागे सोडले. 106 धावा पार करताच राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 1500 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विराट कोहलीला के एल राहुलने मागे सोडले आहे. राहुलने एकदिवसीय सामन्यांच्या 36 डावांमध्ये 1500 धावा पूर्ण केल्या, तर विराट कोहलीने 38 डावात ही कामगिरी केली आहे. राहुलचे हे इंग्लंडविरुद्धचे पहिले एकदिवसीय शतक आहे. तर, या प्रकारातील हे त्याचे पाचवे शतक आहे. राहुलने आपल्या खेळीत 2 षटकार आणि 7 चौकार लगावले. सलामीवीरांच्या अपयशानंतर राहुलने विराट आणि ऋषभसोबत भागीदारी रचत संघाला एक विशाल धावसंख्या उभारण्यात मदत केली.

सर्वात कमी डावात 1500 धावा करणारे भारतीय फलंदाज
36- केएल राहुल
38- विराट कोहली
38- शिखर धवन
39- नवजोत सिंह सिद्धू
43- सौरव गांगुली