मिल्खा सिंग यांच्या पत्नीचं पोस्ट कोविडमुळे निधन
क्रीडा

मिल्खा सिंग यांच्या पत्नीचं पोस्ट कोविडमुळे निधन

नवी दिल्ली : धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे पोस्ट कोविडच्या विविध गुंतागुंतीच्या आजारांमुळं निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. निर्मल कौर या भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारही होत्या. यासह त्यांनी पंजाब सरकारमध्ये क्रीडा संचालक या पदावरही काम केले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

निर्मल कौर यांचे रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास निधन झाले असून मिल्खा सिंग हे सध्या रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये दाखल असल्यामुळे आपल्या पत्नीच्या शेवटच्या संस्कारात भाग घेऊ शकले नसल्याचे मिल्खा सिंग यांच्या परिवाराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कोरोना विषाणूशी झुंज देणाऱ्या निर्मल कौर यांना २६ मे रोजी मोहालीच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांनाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुटुंबाच्या विनंतीवरून मिल्खा सिंग यांना एका आठवड्यानंतर सोडण्यात आलं. पण, निर्मल यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. नंतर मिल्खा सिंग यांना पीजीआयच्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आलं. मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीमध्ये सातत्यानं सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.