तिसऱ्या सामन्यात शमीने २ बळी घेतले तर मोडणार १८ वर्षांपूर्वीचा विक्रम
क्रीडा

तिसऱ्या सामन्यात शमीने २ बळी घेतले तर मोडणार १८ वर्षांपूर्वीचा विक्रम

कॅनबेरा : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला तिसऱ्या वनडेमध्ये १८ वर्षांपूर्वीचा विकम मोडण्याची सुवर्ण संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शमीने चांगली गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतले होते. तिसऱ्या वनडेमध्ये जर शमीने चांगली गोलंदाजी केली तर त्याच्याकडे १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शमीने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन विकेट्स मिळवल्या तर त्याला १८ वर्षांपूर्वीचा सर्वात जलद भारतासाठी १५० बळी मिळवण्याचा विक्रम करता येऊ शकतो. आतापर्यंत शमीच्या नावावर या ७९ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४८ बळी आहेत. यापूर्वी भारताकडून सर्वात जलद १५० बळी मिळवण्याचा विक्रम हा अजित आगरकरच्या नावावर आहे. आगरकरने १८ वर्षांपूर्वी ९७ एकदिवसीय सामन्यांमध्ये आपले १५० बळी पूर्ण केले होते. त्यामुळे तिसऱ्या वनडेमध्ये सर्वात जलद १५० बळी मिळवण्याचा मान शमीला मिळू शकतो. पण त्यासाठी त्याने या सामन्यात दोन बळी मिळवणे गरजेचे आहे.

शमीने जर या वनडे सामन्यात १५० बळी मिळवले तर तो सर्वात जलद बळी मिळवण्याच्या जागतिक यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो. कारण सर्वात जलद १५० बळी पूर्ण करण्याचा मान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर आहे. कारण स्टार्कने ७७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५० बळी पूर्ण केले होते. या यादीत शमीचा तिसरा क्रमांक लागू शकतो. पण त्यासाठी शमीने तिसऱ्या वनडेमध्ये दोन बळी मिळवणे गरजेचे आहे.