क्रीडा

आयपीएलच्या पार्श्वभूमीवर नेहराचे धोनीबाबत महत्वपूर्ण विधान; म्हणाला…

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. तशी माध्यमांमध्ये त्याच्या निवृत्तीची चर्चा ही नेहमीच होत आहे. मात्र, यावेळी त्याच्या चर्चेसाठी वेगळं कारण आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने धोनीबाबत एक महत्वपूर्ण विधान केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जेवढी मला माहिती आहे त्यानुसार धोनीने भारताकडून आपला अखेरचा सामना खेळला आहे. धोनीला आता कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवायची गरज नाहीये. त्याने अद्याप निवृत्तीची घोषणा केलेली नसल्यामुळे आपण आणि प्रसारमाध्यमं याबद्दल एवढी चर्चा करतोय. त्याच्या डोक्यात काय सुरु आहे हे तोच सांगू शकतो, असे नेहराने म्हटले आहे. नेहरा Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता. संयुक्त अरब भारतामध्ये होणाऱ्या आयपीएलच्या पार्श्वभूमीवर आशिष नेहराचे हे विधान महत्वाचे आहे. महत्वाची बाब म्हणजे धोनी ने अजुनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली नाही.

धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीविषयी बोलताना नेहरा म्हणाला की, मला नाही वाटत आयपीएलमुळे धोनीच्या कारकिर्दीवर परिणाम होईल. धोनीला काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. दरम्यान, महेंद्र सिंग धोनी 2019 मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. धोनीचे भारतीय क्रिकेटसाठी असलेलं योगदान खूप मोठं असून त्याच्या कारकिर्दीत भारतीय संघाने तिन्ही आंतरराष्ट्रीय ट्राफीज जिंकल्या आहेत. 2007 मध्ये झालेला टी – 20 विश्वचषक, 2011 ला झालेला एकदिवस विश्वकरंडक तसेच आशिया कप स्पर्धा जिंकण्यात देखील त्याचे महत्वपूर्ण योगदान आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत