शेवटच्या षटकात ३५ धावांची गरज, मग ठोकले ६ षटकार
क्रीडा

शेवटच्या षटकात ३५ धावांची गरज, मग ठोकले ६ षटकार

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत अनेक फलंदाजांनी सहा चेंडूत सलग सहा षटकार ठोकले आहेत. पण, पहिल्यांदाच एक पराक्रम आयर्लंडच्या जॉन ग्लासने केला आहे. गुरुवारी क्लब क्रिकेट सामन्यादरम्यान त्याने एका षटकात सहा षटकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हा सामना नॉर्दर्न आयरिश क्लब क्रेगाघ आणि बेलीमेना यांच्यात खेळला जात होता. शेवटच्या षटकात बेलीमेनाने विजयासाठी ३५ धावांची गरज होती. शेवटच्या षटकात ३५ धावा करणे अजिबात सोपे नसल्यामुळे क्रेगाघ संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र जॉन ग्लासच्या मनात वेगळेच होते. शेवटच्या सहा चेंडूंमध्ये सलग सहा षटकार ठोकत त्याने खळबळ उडवून दिली. त्याच्या खेळीमुळे बेलीमेनाने लागन व्हॅली स्टील्स २०२१चे विजेतेपद जिंकले. अखेरच्या षटकाच्या अगोदर कर्णधार ग्लास ५१ धावांवर होता. त्याने नाबाद ८७ धावा केल्या आणि आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. तो सामनावीर म्हणून निवडला गेला.

जगातील अनेक महान फलंदाजांनी एका षटकात षटकार मारण्याचा पराक्रम केला. या यादीत युवराज सिंग, हर्शल गिब्स, कायरन पोलार्ड, थिसारा परेरा आणि रवी शास्त्री या दिग्गज खेळाडूंची नावे आहेत.