पॅरालिम्पिकमध्ये भारताचे खाते उघडले; भाविना पटेलला मिळाले रौप्यपद
क्रीडा

पॅरालिम्पिकमध्ये भारताचे खाते उघडले; भाविना पटेलला मिळाले रौप्यपद

टोकियो : टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे पदकांचे खाते उघडले आहे. टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने भारतासाठी पहिले पदक आणले आहे. भारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टोकियो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाबेनचा ३-० असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने मने जिंकली आहेत. भारताच्या भाविनाबेन पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता.

३४ वर्षीय भाविनाबेनने शनिवारी क्लास ४च्या उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता. भाविनाने भारतीय शिबिरातील सर्वांना चकित करून जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ७-११, ११-७, ११-४, ९-११, ११-८ ने पराभूत केले होते.