पाकिस्तानी गोलंदाज करतात वयचोरी; माजी गोलंदाज आसिफने केली पोलखोल
क्रीडा

पाकिस्तानी गोलंदाज करतात वयचोरी; माजी गोलंदाज आसिफने केली पोलखोल

कराची : पाकिस्तान क्रिकेट संघातील गोलंदाज वयचोरी करत असल्याचा धक्कादायक आरोप संघाचा माजी गोलंदाज मोहम्मद आसिफने केला आहे. ते फक्त कागदावर तरुण आहेत. मात्र वास्तविकपणे त्यांचे वय जास्त आहे, असे आसिफने म्हटले आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजाचं कागदावर वय १७-१८ असते. मात्र त्यांचं खरं वय २७-२८ वर्ष असते, पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कमरान अकमल याच्या यु-ट्यूब चॅनलवर चर्चा करताना ३८ वर्षीय आसिफनं पाकिस्तानी गोलंदाजांची पोलखोल केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आसिफ म्हणाला, अलीकडच्या काळात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीची धार दिसत नाही. ५-६ वर्षात एकाही गोलंदाजाला कसोटी सामन्यात १० बळी घेता आले नाहीत. पाच-सहा षटके टाकल्यानंतर या नव्या दमाच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षणासाठीही उभे राहता येत नाही, इतकी त्यांची दमछाक होते. आधीच्या गोलंदाजाप्रमाणे कसोटीत २० विकेट घेण्याची क्षमता पाकिस्तानी गोंलादाजीमध्ये दिसत नाही, अशी खंतही आसिफने व्यक्त केली.

सध्याच्या पाकिस्तानी गोलंदाजाकडे पुरेसा अनुभव नाही. त्यांना माहित नाही की, फलंदाजांना पुढच्या पायावर चेंडू कसा फेकायचा. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना काय करावं? त्याचबरोबर धावा न देता यष्टीवर कशी गोलंदाजी करावी. जेव्हा ते यष्टीवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते डाव्या बाजूला जातात. सध्याच्या गोलंदाजाकडे नियंत्रणच नसल्याचेही आसिफ म्हणाला.