भारतीय खेळाडूंच्या बायका गेल्या शॉपिंगला; अन्…
क्रीडा

भारतीय खेळाडूंच्या बायका गेल्या शॉपिंगला; अन्…

सिडनी : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. खेळाडूंसोबत दौऱ्यावर असलेल्या बायकांनी एक दिवस आपल्या मुलांना सांभाळण्यातून सुट्टी घेत शॉपिंगला जायचा प्लान आखला आणि मुलांची जबाबदारी आपल्या पतींवर सोपावली आहे. अजिंक्य रहाणेने पुजारा आणि आश्विनसोबतचा एक फोटो पोस्ट करत पत्नी राधिकाला माझ्यासाठी काय आणतेयस हे पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वन-डे मालिका पार पडल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. यानंतर १७ डिसेंबरपासून ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. कर्णधार विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळून आपली पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी भारतात परतणार आहे. यावेळी अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्व येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, पहिल्या दोन वन-डे सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारत तिसऱ्या वन-डे सामन्यात व्हाईटवॉश टाळण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. भारताकडून कसोटी मालिका खेळणारे खेळाडू सध्या सरावात व्यस्त असून नुकतीच उप-कर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रविचंद्रन आश्विन यांच्या खांद्यावर मुले सांभाळण्याची नवीन जबाबदारी आल्याचे आपल्याला पाहायला मिळाले.