IPL 2021 : या संघाने कर्णधारालाच दिला निरोप
क्रीडा

IPL 2021 : या संघाने कर्णधारालाच दिला निरोप

नवी दिल्ली : पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १४व्या पर्वाच्या मिनी ऑक्शन म्हणजेच प्राथमिक लिलावामध्ये राजस्थान रॉयल्सने आपल्या संघाचा स्टार कर्णधार स्टीव्ह स्मिथला करार मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बरीच चर्चा केल्यानंतर राजस्थान संघाच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला संघाकडून कोणते खेळाडू कायम ठेवले जाणार आहेत यासंदर्भातील यादी पाठवण्याच्या शेवटच्या दिवशी स्मिथला करार मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

स्मिथने २०१४, २०१५, २०१९ आणि २०२० च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. मागील पर्वामध्ये राजस्थानचा संघ पॉइण्ट टेबलमध्ये अगदी तळाशी होता. याच कारणामुळे स्मिथला वगळण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे समजते. राजस्थान रॉयल्सनेही ट्विटरवरुन यासंदर्भातील एक पोस्ट करत राजस्थानचा संघ स्मिथचा निरोप घेत असल्याचे म्हटले आहे. नुकत्याच भारताबरोबर झालेल्या कसोटी मालिकेमध्येही स्मिथने चांगली कामगिरी केली. असं असलं तरी ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर चषक १-२च्या फरकाने गमावला आहे.